अकरावीत शिकणाऱ्या आदित्यचा भन्नाट प्रयोग

धनंजय साळवे

कवठे येमाई – सविंदणे येथे अकरावीत सविंदणे येथे अकरावीत शिकणारऱ्या कु.आदित्य संदिप कदम या शालेय विद्यार्थ्याने जुन्या हिरो होंडा सी.डी.१०० एस.एस.या गाडीच्या इंजिनमध्ये थोडा बदल करुन गाडी पायाने किक न मारता हाताने बटनावर चालु करण्याची किमया केली आहे. या साठी त्याला कान्हुर मेसाई येथील तरुण सचिन पुंडे या तरुणाने मदत केली.आदित्य याच्या वडीलांचे कवठे येमाई येथे गुरुकृपा ऑटो हे दुकान आहे.

शाळा शिकुन तो वडीलांना गाडया दुरुस्तीला मदत करत असतो.त्याने विज्ञान प्रदर्शनात अनेक ठिकाणी बक्षिसे मिळवली आहेत. या प्रयोगासाठी त्याने एक अल्टरनेटर मिळविला व जुन्या होंडा एस एस च्या इंजिनमध्ये थोडा फार बदल करुन प्रयोग यशस्वीरित्या पुर्ण केला.या प्रयोगामुळे वयस्क व ज्यांना पायाच्या दुखण्याचा त्रास आहे त्यांना निश्चित फायदा होईल. तसेच जे नविन गाडी खरेदी करु शकत नाही परंतु त्यांना बटन स्टार्ट गाडी पाहिजे त्यांना हा प्रयोग फायदेशीर आहे.

Previous articleतालुकास्तरीय इंग्रजी अध्ययन समृद्धी स्पर्धेत नारायणगाव नंबर दोन शाळेची उल्लेखनीय कामगिरी
Next articleमुंजाळवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी पा़ंडुरंग मुंजाळ