बकोरी देवराई वनराई प्रकल्पातील झाडांवर पुन्हा एकदा कोसळले आगीचे संकट

गणेश सातव,वाघोली

बकोरी येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर १६० मध्ये माहिती सेवा समिती,दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान,शिरूर हवेली वाॅकींग ग्रुप व इतर सहयोगी संस्था यांचे माध्यमातून २०१७ पासून सातत्याने वृक्षारोपण करण्यात येत आहे.त्याठिकाणी जवळपास २५००० देशी झाडे लावून पुढे त्यांचे संगोपन नियमित सुरू आहे.
परिसरात खाजगी प्लॉटिंग व्यवसाय जोरात असल्याने अनेक शेतीजमीनीमध्ये प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आहे.त्या प्लॉटिंगमध्ये सांयकाळी अनेक मद्यपी मद्यपान करायला बसत असतात.साधारण महीनाभरापुर्वी त्याठिकाणी अज्ञातांकडून आग लावली होती. त्यावेळी लागलेल्या आगीत अनेक वृक्ष जळून खाक झाले होते.

त्या ठिकाणी अश्या आपत्तीतं वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे,वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, बकोरी गावातील तरुण कार्यकर्ते आग विझवण्यासाठी नेहमीचं प्रयत्न करत असतात.आजही त्याठिकाणी सकाळी ११ च्या दरम्यान डोंगराचे पायथ्याशी असलेल्या प्लाॅटींगमधील एका प्लॉटमध्ये वाळलेले गवत पेटवले होते.लक्ष न दिल्याने ती आग तशीच डोंगराकडे गेली.त्या आगीमुळे ५०० पेक्षा जास्त झाडे व झाडांना पाणी देण्यासाठी असणारा पाईप जळून खाक झाला.आगीची तिव्रता मोठी असल्याने अनेक पक्षी,सरपटणारे वन्यजीव हि अक्षरशः होरपळून मरण पावले.

वृक्ष मित्र,जेष्ठ पत्रकार शरदराव पाबळे यांनी भेट देऊन घडलेल्या घटनेबाबत माहिती घेतली.त्यानंतर शरद पाबळे व चंद्रकांत वारघडे यांनी लोणीकंद पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आली.बकोरी वनराई परिसरात रोज सांयकाळी गस्त घालनेबाबत विनंती करण्यात आली असून,पोलीस निरीक्षक पवार यांनी तातडीने आपल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांना गस्त घालण्याबाबतच्या सुचना केल्या व संबंधित घटनेचा तपास करुन योग्य ती कारवाई करण्याबाबत सांगीतले.

Previous articleतिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ग्रामस्थांची संयुक्त सभा पार पडली
Next articleशिनोली येथे लाखो रुपयांच्या सागाच्या झाडांची बेकायदा कत्तल