तिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ग्रामस्थांची संयुक्त सभा पार पडली

आंबेगाव : तिरपाड , नाव्हेड , डोन नानवडे ग्रामस्थांची यांची संयुक्त सभा ( दि.५) रोजी पार पडली . यावेळी तिरपाड याठिकाणी सुरू असणाऱ्या फॉरेस्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांनी वारंवार विरोध केला आहे . पेसा सभा व ग्रामसभा यामध्ये देखी वारंवार विरोध केला आहे . तरीदेखील ग्रामस्थांच्या ठरावाला न जुमानता वन अधिकारी यांनी हे काम ग्रामस्थांना धमकावून चालू ठेवले आहे . याबाबत डोण या ठिकाणी सभा घेण्यात आली सभेसाठी तरुण बहुसंख्येने उपस्थित होते .त्यावेळी सभेमध्ये या कामाला संविधानिक लढा देऊन बंद करायची ठरले . त्याचप्रमाणे वन हक्क दावे असतील महाराष्ट्र शासन खाजगी वन हे सर्व दावे निकाली काढून मूळ मालकाच्या नावावर परत जमिनी करण्यात याव्यात त्यासाठी यापूर्वी ग्रामसभेमध्ये ठराव झालेले आहेत व सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा झाला आहे . सरकार ने पत्र काढून देखील या गोष्टी होत नाहीत याच्या पाठीमागे कोण आहे असा सवाल तरुणांनी केला .

आदिवासी भागातील लोकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे ही खेदजनक बाब आंबेगाव तालुक्यामध्ये घडते आहे . असे अबु दाते यांनी नमूद केले . ज्यावेळी राजकीय कार्यक्रम असतात त्यावेळी लोकांना अमिष दाखवून गोळा करणारे राजकीय पुढारी सुद्धा या सभेकडे पाठ फिरवंतां ना दिसले त्यामुळे तरुणांमध्ये नाराजी आहे . याबाबत सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे फायद्याची असेल तर पुढारी असतात आणि अन्याय झाल्यावर पुढारी प्रशासनाची बाजू घेतात असा स्वर सभेत दिसला .

यापुढे आदिवासीला न्याय आणि हक्कासाठी झगडावे लागत आहे त्याचा कायद्याचा अवमान होत आहे ही बाब खेदजनक आहे असे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी यावेळी नमूद केले .

यासाठी सर्वांनी आदिवासींच्या मागे उभे राहा असे आवाहन देखील केले . त्यानंतर सर्व सभा बांधकामाच्या ठिकाणी गेले असता तेथील वन अधिकाऱ्यांनी उद्या आपण काम बंद ठेवा असे सांगितले तोंडी सांगितले परंतु सकाळ पर्यंत दुसऱ्या दिवशी पोलीस फोर्स लावून काम चालू ठेवले . यावेळी जीवन माने यांनी सदर काम पेसा कायद्यामध्ये येत नाही आणि तुम्ही कायदा हातात धरायचा नाही असं ग्रामस्थांना सांगितले गरीब भोळाभाबडा आदिवासी या गोष्टीला घाबरून विरोध केला नाही . परंतु असा आदिवासींच्या बाबतीत किती दिवस पडणार अशी चर्चा आदिवासी भागांमध्ये आहे आदिवासींना कोणी वाली आहे का ? की आयुष्यभर त्यांनी दुसऱ्यांच्या आधारावर जगायचं असा सवाल उपस्थित होत आहे .

निवडणुकीपुरते पुढारी येतात आश्वासने देतात मात्र ज्यावेळी अन्याय होतो . त्यावेळेस मात्र आदिवासींना वाऱ्यावर सोडले जाते .
वनविभागाची मनमानी व पेसा कायदयाची पायमल्ली झाली आहे . सदर वन विभागाचे बांधकाम चालू राहिले तर येणाऱ्या सर्व निवडणुकी वर बहिष्कार टाकायचा असं ठरले आहे . असा ठराव यापुढील ग्रामसभेत ग्रामस्थ घेणार आहेत . या वेळी मोठ्या संख्येने चारही गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते .

Previous articleआहुपे येथील भैरवनाथ क्रिकेट क्लब ने पटकाविला आदीवासी चषक
Next articleबकोरी देवराई वनराई प्रकल्पातील झाडांवर पुन्हा एकदा कोसळले आगीचे संकट