हरिभाऊ आडकर यांचा तहसीलदार मधूसुदन बर्गे यांच्या हस्ते गौरव

पवनानगर – मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भडवली शाळेचे शिक्षक हरिभाऊ दशरथ आडकर यांनी कोरोना काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचे काम करत असताना गरुडा ॲपच्या माध्यमातून उत्कृष्ट प्रकारचे काम व मतदान केंद्रावरील शून्य टक्के पेंडिंग काम केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (मावळ तालुका)म्हणून हा पुरस्कार मावळचे तहसीलदार मधूसुदन बर्गे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते वडगांव मावळ कार्यालयात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

हरिभाऊ आडकर हे गेली पंधरा वर्षे तालुक्यातील B.L.O.चे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर पणाने भूमिका मांडतात .त्यांना तालुक्यात बीएलओ हृदयसम्राट म्हणून देखील ओळखले जाते . शिक्षकांचे प्रश्न सोडवणे त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका संघटनेच्या माध्यमातून आडकर यांनी कायमच ठेवलेली आहेत.अशा मावळ तालुक्यातील भडवली गावच्या या आदर्श शिक्षकाना पुरस्कार मिळाल्याबद्दल तालुक्यामधील शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पुरस्कार प्रदान कार्यक्रमा प्रसंगी मावळ तालुका शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन वाघमारे,वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोरख जांभूळकर,महसूल चे उत्तम लोंढे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

Previous articleयेलवाडी येथे मोफत इ श्रम कार्डचे वाटप
Next articleहवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा भोरडे यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा