येलवाडी येथे मोफत इ श्रम कार्डचे वाटप

चाकण- खेड तालुक्यातील येलवाडी येथे मोफत ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल (संत तुकाराम नगर) यांच्या वतीने करण्यात आले होते.

इ-श्रम कार्ड मुळे असंघटित कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भिसे, भगवान वैराट यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गोरगरीब जनतेला शासनाची मदत सहज रित्या मिळावी हा प्रामाणिक उद्देश लक्षात घेऊन सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर ई श्रम कार्ड हे विज बिल सब्सिडी, शैक्षणिक मदत, मुली साठी सुविधा, स्वास्थ्य सुविधा, बेरोजगार भत्ता यासाठी उपयोगात येते. सदर शिबिराचा लाभ अनेक गरीब गरजू नागरिकांनी घेतला सदर कार्यक्रमाच्या वेळी येलवाडी येथे शाखाप्रमुख म्हणून हनुमंत पवार यांना नियुक्ती देण्यात आली.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सामाजिक अंतर ठेवून नागरिकांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती खेड, व दत्तात्रय क्षीरसागर, वरिष्ठ अधिकारी सुभाष गलांडे, अक्षय जाधव यांनी परिश्रम घेतले

Previous articleछत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा गुलाब वाघमोडे तर स्वागताध्यक्षपदी दत्तात्रय कड यांची निवड
Next articleहरिभाऊ आडकर यांचा तहसीलदार मधूसुदन बर्गे यांच्या हस्ते गौरव