मंगळवार पेठेतील प्रंलबित विकासकामे करण्याचे सदानंद शेट्टी यांचे आश्वासन

Ad 1

अमोल भोसले, पुणे -प्रतिनिधी

पुणे शहरातील मंगळवार पेठ शिवाजी स्टेडियम झोपडपट्टीमध्ये ड्रेनेज लाईनमुळे पाणी शिरले होते तसेच २२६, २२७ मधून येणारी ड्रेनेज लाईन ही ३६ इंची लाईन म्हणजे जुन्या बाजाराकडे खाली खड्ड्यात जाते त्यामुळे मज्जिद पर्यंत ड्रेनेज लाईन तुंबते म्हणून २२६, २२७ मधून येणारा मोठा ड्रेनेजचा प्रवाह जुन्या बाजाराकडे जातो तो मध्येच कट करून लाईन अन्यत्र वळवून लोड कमी करणे व वेगळी लाईन टाकणे व काची मळा येथे वेगळी लाईन टाकणे यासाठी जुलै मध्ये पाहणी दौरा केला होता.

यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी सोबत ड्रेनेज विभागाचे अभियंता निकटे मॅडम , राजूरकर साहेब, डमरे साहेब यांनी पुन्हा पाहणी केली व काल( दि. ११) रोजी २२७ मंगळवार पेठ येथील फरशा बसविण्याच्या कामाची पाहणी केली होती त्या दुरुस्त करण्याचे काम सोमवार (दि. १७) पासून करण्यात यावे असा निर्णय झाला.