जीवे मारण्यांची धमकी देत १८ वर्षीय मतीमंद मुलीवर बलात्कार

राजगुरुनगर– कनेरसर (ता. खेड ) येथे मतीमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. मतीमंद मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित महेश पोपट दौंडकर यांच्या विरोधात पिडित मुलीच्या आईने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

           याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिडित मुलगी जन्मजात मतीमंद आहे. सहा महिन्यापुर्वी पिडित मुलीच्या घरातील आईवडील शेतात कामासाठी व दोन लहाण बहिनी शाळेत गेल्यावर पिडित मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित महेश दौंडकर हा त्यांच्या घराशेजारी राहण्यास आहे. दोंडकर हा घरी व आजुबाजुला कोणी नसल्याचा फायदा घेत पिडित मतीमंद मुलीच्या घरात जाऊन जबरदस्तीने संभोग करित असे, तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत असे, दरम्यान काही दिवसांनी पिडित मुलगी आजारी असल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी खाजगी दवाखन्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले होते.

आई वडिलांनी तिला मोशी येथील चैतन्य महिला संस्था येथे दाखल केले होते. या घटनेबाबत चैतन्य महिला संस्थेन खेड पोलिसांना माहिती दिली होती.खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुरेखा भोर यांनी पिडित मुलीचे समुपदेशन करुन विचारले असता पिडित मुलीने सांगितले घरा शेजारील महेश दौंडकर उर्फ पिंटया हा घरी कोणी नसताना घरात येऊन अंगावरील सर्व कपडे काढून संभोग करीत असे, तसेच या बद्दल कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी देत असे. भितीपोटी पिडित मुलीने याबाबत कोणास काही सांगितले नाही. मात्र ६ महिन्याची गर्भवती राहिल्याने याला वाचा फुटली आहे. याबाबत संशयित आरोपी महेश दौंडकर यांच्या विरुध्द खेड पोलिस ठाण्यात पिडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खेड उपविभागीय पोलिस आधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरिक्षक सतिश गुरुव, सहाय्यक पोलिस निरिक्षक निलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलिस हवालदार सुरेखा भोर करत आहे.

कनेरसर येथील गोकुळ शेत परिसरात राहणार्‍या या मतीमंद १८ वर्षीय मुलीवर शेजारीच राहणार्‍या महेश दौंडकर या नराधमाने बलात्कार केला आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या नराधमाने  मुलीला जीवे मारणाची धमकी देऊन तिच्यावर बळजबरी केली.आरोपीला कठोर शासन करीत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पिडित मुलीच्या आईवडिलांनी केली आहे.

Previous articleनारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक हांडे यांच्यावर गुन्हा दाखल:एसीबी ची कारवाई
Next articleमंगळवार पेठेतील प्रंलबित विकासकामे करण्याचे सदानंद शेट्टी यांचे आश्वासन