नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील व पोलीस नाईक हांडे यांच्यावर गुन्हा दाखल:एसीबी ची कारवाई

नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे व पोलिस नाईक डी.के. हांडे यांच्यावर पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करून या गुन्ह्यांमधील इतर दोन आरोपींना अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, पोलिस निरीक्षक सुनिल बिले, पोलीस हवालदार टिळेकर, पोलिस शिपाई थरकार, पोलिस शिपाई महाशब्दे यांच्या पथकाकडुन ही कारवाई करण्यात आली.

नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि घोडे पाटील व पोलिस नाईक हांडे यांच्या घराचीही तपासणी करण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती पुणे अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक दत्तात्रय भापकर यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी आपल्याला नाहक गुंतवण्यात आले असल्याचे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

Previous articleजिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Next articleजीवे मारण्यांची धमकी देत १८ वर्षीय मतीमंद मुलीवर बलात्कार