जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

Ad 1

दिनेश पवार-दौंड(प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, दौंड शुगर चे संचालक, वीरधवल बाबा जगदाळे यांचा 53 वा वाढदिवस दौंडमध्ये सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोरोना च्या प्रादुर्भावात रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर,परिचारिका, सेवक वर्ग आणि कोरोना रुग्ण यांच्यासाठी आयुर्वेदिक काढा,फळे,मास्क इत्यादी वस्तू चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम दौंडमधील पिरॅमिड हॉस्पिटल व सुश्रुषा नर्सिंग होम याठिकाणी आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर खेडगीकर, धनंजय रणदिवे, निखिल ओझा, ओंकार सातपुते, फौजान तांबोळी, निलेश उपाध्ये,प्रवीण धर्माधिकारी यांनी परिश्रम घेतले.

काळेवाडी येथील परमेश्वर गायकवाड यांनी व कार्यकर्त्यांनी दौंड मध्ये असणाऱ्या अविश्री बालसदन येथे अनाथ मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊ चे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

वीरधवल बाबा जगदाळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटात अनेक विविध प्रकारची सामाजिक कामे केली आहेत व करत आहेत,तरुणांचे प्रश्न मार्गी लावणे,शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे यांना त्यांनी प्राधान्य दिले आहे,आरोग्य विषयी सुविधा उपलब्ध करून देणे,बालकांच्या विविध योजना राबविणे आदी कामांना त्यांनी प्राधान्य दिले आहे,त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील सामाजिक बांधिलकी चे उपक्रम तरुणांनी राबविण्यावर भर दिला.