विजतोड त्वरित थांबवा, तोडलेली वीज जोडून द्या : माजी आमदार रमेश थोरात

योगेश राऊत ,पाटस

महावितरण कंपनीकडून दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपंपाची वीज तोडणी सुरू आहे . त्यामुळे दौंड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनीही महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची वीज तोडू नये आणि तोडलेली वीज पुन्हा जोडून द्यावी अशी मागणी महावितरण कंपनीचे केडगाव येथील कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन केली आहे .

गेल्या दोन वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रासलेला आमचा शेतकरी अत्ता कुठे तग धरू लागला आहे . त्यात मुदतवाढ देणे आवश्यक आहे असे लेखी निवेदन आज महावितरण कंपनीला देण्यात आले आहे .
यावेळी माजी आमदार रमेशअप्पा थोरात यांसह दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार , पुणे जिल्हा समाजकल्याण सभापती सारीकाताई पानसरे , महिला सरचिटणीस वैशालीताई नागवडे , मा.सभापती मीनाताई धायगुडे , पं.स.सदस्या आशाताई शितोळे , नितीन दोरगे , सरपंच अवंतिकाताई शितोळे , शिवाजी ढमाले आदी मान्यवर व शेतकरी बांधव उपस्थित होते .

Previous articleअखेर पीएमपीएलची बससेवा कुरकुंभ पर्यंत ..!
Next articleप्रा. सचिन घायतडके नेट परीक्षा उत्तीर्ण