प्रा. सचिन घायतडके नेट परीक्षा उत्तीर्ण

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील राज्यशास्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक सचिन सहादू घायतडके हे UGC ने जुन २०२१ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत ते राज्यशास्र विषयात नुकतेच उत्तीर्ण झाले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे, उपाध्यक्ष श्री.तुकाराम काळे, कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे, प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रा.सुनिल नेवकर,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक,इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleविजतोड त्वरित थांबवा, तोडलेली वीज जोडून द्या : माजी आमदार रमेश थोरात
Next articleजेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचा विज्ञान विषयावर विद्यार्थीनींशी संवाद