युवासेनेच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी प्रताप कांचन

उरुळी कांचन

युवा सेनाच्या पुणे जिल्हा समन्वयकपदी प्रताप मारुती कांचन यांची   निवड करण्यात आली. यावेळी हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांच्या हस्ते कांचन यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते युवा सेना प्रमुख पर्यावरण-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिरुर लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या केल्या आहेत.

पक्षाने दिलेली जबाबदारी स्थानिक पातळीवर संघटनेच्या माध्यमातून यशस्वी पार पाडणार संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन समन्वयकपदी निवड झाल्याने प्रताप कांचन यांनी सांगितले.

Previous articleविद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यक्रमात ‘स्वसंरक्षण’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
Next articleअखेर पीएमपीएलची बससेवा कुरकुंभ पर्यंत ..!