अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळाचे सुलोचना ताई झेंडे स्कूल मध्ये शिवजयंती उत्सवा निमित्त शिव व्याख्याते गणेश महाराज फरताळे याचे व्याख्यान

उरुळी कांचन

अंधश्रद्धा निर्मूलन जाती पाती रुढी परंपरांच्या पलीकडे काम करुन स्वराज्य निर्मिती करणा-या दिशादर्शक छत्रपती शिवरायांचे विचार जाणून घेत आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत शिवव्याख्याते गणेश महाराज फरताळे यांनी व्यक्त मांडले.

कुंजीरवाडी (ता.हवेली) येथील अहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळाचे सुलोचना ताई झेंडे स्कूल मध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिव व्याख्याते ह भ प गणेश महाराज फरतळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव सुनील थोरात, विद्यावयाचे आधारस्तंभ बाळासाहेब झेंडे, सुलोचना ताई झेंडे, मुख्यध्यपिका अश्विनी नाडे सहकारी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकुरकुंभ व पाटस च्या ग्रामस्थांची प्रतिक्षा संपली : गुरुवारी पीएमपीएल ची बससेवा कुरकुंभ पर्यंत होणार सुरू
Next articleनारायणगाव येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात