कुरकुंभ व पाटस च्या ग्रामस्थांची प्रतिक्षा संपली : गुरुवारी पीएमपीएल ची बससेवा कुरकुंभ पर्यंत होणार सुरू

योगेश राऊत ,पाटस

पुणे महानगरपालिकेची पीएमपीएल बस ही पाटस – कुरकुंभ पर्यंत गुरुवार ( ता. २४) रोजी सुरू होत आहे .महानगरपालिकेची पीएमपीएल बससेवा ही दौंड तालुक्यतील यवत , चौफुला व वरवंड पर्यंत ही बस रोज नियमितपणे सुरू असल्याने या भागातील नागरीकांचा अंत्यत चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता ही बस कुरकुंभ व पाटस पर्यंत सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन मंडाळाने घेतला आहे . येत्या गुरूवारी ( ता.२४ ) फ्रेब्रुवारी पासून धावणार असल्याची माहिती पुणे महानगर परिवाहन मंडळाचे वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली . दरम्यान , कुरकुंभ आणि पाटस पर्यंत ही बससेवा सुरू करण्यासाठी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी पाठपुरावा केला होता . त्यांच्या या प्रयत्नाना यश आले असून कुरकुंभ व पाटस परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे . पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपीएलची बस सेवा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सेवेसाठी सुरु केली होती. मागील काही महिन्यांपासून ही बस दौंड तालुक्यातील राहु ,यवत आणि पारगाव व वरवंड पर्यंत सुरू आहे .

वरवंड येथे या बसच्या फेऱ्या सुरू करण्याच्या पार पडलेल्या कार्यक्रमात तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तथा आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे पाटस ते कुरकुंभ पर्यंत ही बस सेवा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायत पाटस, कुरकुंभ, पांढरेवाडी, तसेच ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती . लवकरच ही बस सेवा सुरू करू असे आश्वासन यावेळी जगताप यांनी ग्रामस्थांना दिले होते .

माजी आमदार रमेश थोरात यांनी मागील काही महिन्यापासून परिवहन विभागचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या सोबत सातत्याने बैठक घेवून पाठपुरावा केला होता . सोमवारी ( ता . २१ ) रमेश थोरात यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेवून याबाबत चर्चा केली . यावेळी येत्या गुरूवार पासून पाटस आणि कुरकुंभ पर्यंत बस सेवा सुरू करू असे जाहीर केले . तसेच तालुक्यातील केडगाव व सुपा पर्यंत ही बस सेवा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन झेंडे यांनी थोरात यांना दिले .

Previous articleदहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण – वर्षा गायकवाड
Next articleअहिल्या माता शिक्षण प्रसारक मंडळाचे सुलोचना ताई झेंडे स्कूल मध्ये शिवजयंती उत्सवा निमित्त शिव व्याख्याते गणेश महाराज फरताळे याचे व्याख्यान