पाण्याची लाइन टाकून देण्यात येईल माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचे आश्वासन

Ad 1

अमोल भोसले, पुणे- प्रतिनिधी

माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेट्टी हे मंगळवार पेठ येथे पाण्याची तक्रार पाहणी करण्यासाठी गेले असता तेथील २५ वर्षांपूर्वीची पाण्याची लाइन बदलून तेथे नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांच्या विकास निधीमधून ४ इंची पाण्याची लाइन टाकून देण्यात येईल असे नागरिकांना सांगण्यात आले. तसेच त्या ठिकाणी महानगरपालिका वतीने फरशी टाकण्याचे काम केले होते त्या कामाची पाहणी करताना सर्व फरशा निघालेल्या अवस्थेत दिसल्या त्या दुरुस्त करून देण्याचे देखील काम करून देऊ असे नागरिकांना सांगण्यात आले. यावेळी सोबत पाणी पुरवठा अधिकारी श्री जाधव साहेब , कार्यकर्ते गफार शेख हे होते.