वाघोलीत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व तलाव परिसराची स्वच्छता

गणेश सातव , वाघोली-पुणे

स्वच्छ भारत सर्वेक्षण २०२२ अंतर्गत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने वाघोली गावच्या भैरवनाथ उत्सव यात्रेनिमित्त भैरवनाथ मंदिर आणि तलाव परिसराची साफसफाई करण्यात आली.यावेळी परिसरातील प्लँस्टिक,झाडाचा पाला पाचोळा,पडलेल्या छोट्या फांद्या आदी जमा करून,भैरवनाथ मंदिर परिसर पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आला.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाघोली परिसर कचरा मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,पुढील काही दिवसात वाघोली कंटेनर मुक्त झाल्याचे पाहायला मिळणार आहे.

ही मोहीम पुणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक शंकर जगताप,निरिक्षक हनुमंत काळे,मुकादम सुरेश उबाळे,मुकादम आकाश नर्सिंग,स्वच्छता समन्वयक,सफाई कर्मचाऱ्यांच्यावतीने करण्यात आली.

वाघोली परिसरात रस्त्यालगत व इतरत्र ठिक-ठिकाणी कचरा न टाकता,नागरिकांनी आपला कचरा कचराकुंडीतचं टाकावा.वाघोलीतील सर्व नागरिकांनी “स्वच्छ वाघोली सुंदर वाघोली” या मोहिमेत सहभाग घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहन वडगाव शेरी-नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous articleप्रा. स्नेहा बुरगुल यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी
Next articleवाघोलीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर