प्रा. स्नेहा बुरगुल यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी

उरुळी कांचन

लोणीकाळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील कॉमर्स विभागातील सहाय्यक प्राध्यापिका स्नेहा बुरगुल यांना कॉमर्स शाखे अंतर्गत, ‘ अ स्टडी ऑफ प्रोब्लेम्स अँड प्रोस्पेक्ट्स ऑफ मार्केटिंग ऑफ फॅशन रिटेलर्स विथ स्पेशिअल रेफेरेंअन्स टू क्लाथ रिटेलिंग इन अहमदनगर’ या विषयावरील संशोधनास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. प्रदान केली. त्यांना त्यासाठी बी.जे.एस.कॉलेज वाघोलीचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.

या संशोधनाचा अहमदनगर मधील विविध उद्योजक, छोटे व मोठे उद्योजक तसेच कापड दुकानदार, शैक्षणिक क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक तसेच कॉमर्सचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कापड दुकानदारांमध्ये बाजारपेठ व समस्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच उद्योगधंद्यात वाढीसाठी यात विविध उपाययोजनांची माहिती उपलब्ध झालेली आहे.

प्रा. स्नेहा बुरगुल ह्या कॉमर्स या विषयात नेट ही परीक्षा उत्तीर्ण असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना आंतराष्ट्रीय स्तरावरील ‘ एक्झम्प्लारी एज्यूकेशनिस्ट’ व राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त आहेत. तसेच त्यांचे फायनान्शियल अकौंटं या विषयाचे टेक्स्ट बुक प्रदर्शित आहे.

त्यांच्या या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, सहसचिव (व्यवस्थापन) प्राचार्य डॉ. शेजवळ ,सहसचिव व पुणे विभागप्रमुख (अर्थ) प्राचार्य सीताराम गवळी, सर्व विश्वस्थ, कार्यकारिणी सदस्य तसेच प्राचार्य डॉ. सुनीलकुमार कुरणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleआमदार अशोक पवार यांच्या हस्ते सणसवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ संपन्न
Next articleवाघोलीत पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व तलाव परिसराची स्वच्छता