आमदार अशोक पवार यांच्या हस्ते सणसवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन समारंभ संपन्न

उरुळी कांचन

सणसवाडी (वसेवाडी  ) येथे आमदार अशोक पवार यांच्या आमदार फंडाच्या माध्यमातून व जिल्हा परिषद सदस्या व माजी सभापती सुजाता पवार, पुणे जिल्हा नियोजन समितीचे पंडित दरेकर यांच्या विशेष प्रयत्नांतून विविध विकासकामांच्या व उद्घाटन समारंभ यांच्या हस्ते ५८ लाखाच्या विकासकामांचा उदघाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला.

सणसवाडी (वसेवाडी ) येथे सभागृह मध्ये डिजिटल क्लासरूम, सणसवाडी रोड ते साईनाथनगर (माहेर संस्था) रस्ता करणे,सणसवाडी पिंपळे जगताप रोड ते साईनाथनगर रस्ता करणे,सणसवाडी (वसेवाडी) येथे सभागृह बांधकाम, सणसवाडी येथील नरेश्वर मंदिर परिसरातील रस्ते करणे आदी विकासकामांचा उदघाटन समारंभ आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी आमदार अशोक पवार यांनी पंडित दरेकर यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करत दर्जेदार विकास करणे ही काळाची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीच्या करत असतो यामध्ये पंडित दरेकर असे मत व्यक्त केले. तसेचपंडित दरेकर यांनी विकासाचा एक दृष्टिकोन ठेवत वी इध विकासकामे करण्यासाठी प्रयत्न केले आहे. करोणा काळातील त्यांचे योगदान मोठे आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी त्यांनी चांगले काम केले असून कोव्हीड मदत केंद्रात उल्लेखनीय काम करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून पंडित दरेकर यांच्या कामामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

यावेळी आमदार अशोक पवार , सरपंच पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, सभापती राजेंद्र नरवडे , काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय हरगुडे, रांजणगाव देवस्थानचे अध्यक्ष विजयराज दरेकर, सरपंच स्नेहल भुजबळ , उपसरपंच सागर दरेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, अक्षय कानडे, शशिकला सुनंदा दरेकर, रुपाली दरेकर, ललिता दरेकर, संगीता हरगुडे, राजेंद्र दरेकर, रामदास दरेकर, माजी सरपंच सुनीता दरेकर, ग्रामसेवक बी एच पवने आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Previous articleउरुळी कांचनच्या विकास कामांसाठी कटिबद्ध – आमदार अशोक पवार
Next articleप्रा. स्नेहा बुरगुल यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी