सहज सोप्या भाषेतील संभाषण प्रभावी ठरते – शशांक मोहिते

दिनेश पवार , दौंड

व्यवहारात सहज सोप्या भाषेत केलेले संभाषण प्रभावी ठरते असे मत प्रसिद्ध भाषण कला प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी सिप्ला फाऊंडेशन व दौंड मुख्याध्यापक संघ आयोजित क्रिएटिव्ह कम्प्युटर,दौंड येथे शिक्षकांसाठी सुरु असलेल्या एम. एस.ए.सी.आयटी प्रशिक्षण शिबिरात व्यक्त केले,माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे व यात शिक्षकांनी कुशल व्हावे यासाठी हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे, या स्तुत्य उपक्रमास परिसरातील शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

यावेळी मुख्याध्यापक संघाचे प्रसाद गायकवाड, दौंड रोटरी क्लबच्या मा.सचिव सविता भोर,क्रिएटिव्ह कम्प्युटरच्या संचालिका अर्चना मिसाळ,वरिष्ठ शिक्षक नितीन साळवे व शिक्षक वर्ग उपस्थित होते

Previous articleपुणे ग्रामिण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे राष्ट्रीय खेळाडू अजय घुले यांच्या कार्याचा गौरव
Next articleशिवनेरी ते भोसरी पीएमपीएल बसचे नारायणगावात उत्साहात स्वागत