पुणे ग्रामिण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे राष्ट्रीय खेळाडू अजय घुले यांच्या कार्याचा गौरव

उरुळी कांचन

महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख पोलिस महासंचालक संजय पांडे यांचे कडुन पुणे ग्रामिण पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे राष्ट्रीय खेळाडु अजय घुले याच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अजय घुले हे पुणे ग्रामिण पोलिस दलात गेली १५ वर्षा पासुन कार्यरत आहेत नेमबाजी खेळा मध्ये अनेक स्पर्धा मध्ये ते खेळतात. बरेच स्पर्धेमध्ये त्यानी सुवर्ण पदक मिलवले. पुणे ग्रामिण पोलिस दलात एक उत्कृष्ट नेमबाज म्हनुन त्यांची ओळख आहे. मुंबई येथे पोलिस महासंचालक कार्यालय येथे सन २०२० मध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धे मध्ये अजय घुले यानी उत्कृष्ट नेमबाजी करुन सुवर्ण पदक मिळवले होते. कोरोनाच्या संकटामुळे बाक्षिस वितरण राहीले होते तर विशेष प्रावीण्य मिळवले बद्दल सुवर्ण पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पुणे ग्रामीणचे एकमेव राष्ट्रीय नेमबाज खेळाडू पोलीस अंमलदार अजय घुले यांनी सुवर्ण पदक पटकावले त्याबद्दल पोलीस महासंचालक संजय पांडे तसेच अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार यांनी प्रशस्तीपत्र व सुवर्ण पदक देऊन कौतुकाचे शब्द बोलुन गौरविले.

Previous articleसय्यदनगरचे रेल्वे फाटक खुले करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना वेग
Next articleसहज सोप्या भाषेतील संभाषण प्रभावी ठरते – शशांक मोहिते