शिवनेरी ते भोसरी पीएमपीएल बसचे नारायणगावात उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

किल्ले शिवनेरी ते भोसरी या मार्गावर पी एम पी एल बस सेवा आजपासून धूमधडाक्यात सुरू करण्यात आली मात्र भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये जणू काही श्रेयवादाची लढाई पहायला मिळाली. सकाळी साडेदहा ते अकरा वाजता निघालेली ही बस नारायणगावात दुपारी साडेबारा वाजता पोहचली. या श्रेयवादाच्या लढाईत मात्र प्रवाशांचे भलतेच मनोरंजन झाले. जुन्नर येथे राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. जोरदार घोषणाबाजी देत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर जणू काही शक्तीप्रदर्शन केले यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
नारायणगावात या बसचे भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले यावेळी आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, शिवसेनेचे पदाधिकारी व सरपंच योगेश पाटे यांनी बस सुरू करण्याच्या श्रेयवादावरून राष्ट्रवादी पक्षावर व आमदारांवर टीका केली.

 

भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष माळवदकर, नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडीचे सरपंच राजेश मेहेर, माजी सरपंच अशोक पाटे, जंगल कोल्हे, महिला आघाडी भाजपच्या अध्यक्षा डॉ राजश्री इंगवले, कार्याध्यक्ष एडवोकेट तृप्ती परदेशी, संजय परदेशी, प्राजक्ता गाजरे, प्रविण काळे, दिनेश परदेशी, चंद्रकांत फलके, मंदार बुट्टे पाटील, कैलास पानसरे प्रल्हाद पाटे, संजय खैरे, पांडुरंग मेहेत्रे, सोपान खैरे, अक्षय खैरे
ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटे, गणेश पाटे, अक्षय वाव्हळ, माजी उपसरपंच संतोष दांगट, ईश्वर पाटे तसेच भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसहज सोप्या भाषेतील संभाषण प्रभावी ठरते – शशांक मोहिते
Next articleआमदार रमेश थोरात यांचा जीवनसाधना पुरस्कारान गौरव