हवेली तालुक्यात सगळ्यात पहिली आॕनलाईन बैलांची रॕम्पवाॕक स्पर्धेचे पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी केले आयोजन

उरुळी कांचन

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाचे महत्व आहे. भारतीयांच्या नसानसात शेती भरलेली, परंपरागत शेती पासून ते आजच्या आधुनिक शेती पर्यंत या व्यवसायाचा अविभाज्य घटक म्हणजे बैल होय. शेतीतील सर्व कामे करण्यासाठी या जोडीदाराची गरज भासते परंतु हा जिवलग सहयोगी केवळ शेतीसाठी नाही तर घराची शान ठरतो जेंव्हा तो एखाद्या स्पर्धेत सहभागी होतो. बैलगाडा शर्यत म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पंरतु कोरोना माहामारीमुळे सर्वञ याञा जञा बंद होत्या अशातच हवेली तालुक्यात सगळ्यात पहिली आॕनलाईन बैलांची रॕम्पवाॕक स्पर्धा म्हणजे शेतकऱ्यांसाठी अगळीवेगळी होती त्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनामुळे सर्व जग थांबले उद्योग धंदे थंडावले केवळ जगण्याची भ्रांत निर्माण झाली त्यावेळी शेती व्यवसायाने आधार दिला आणि यात मोलाची साथ देणाऱ्या बैलाचा, अशा अविभाज्य घटक असलेल्या हवेलीतील बैलाच्या ऑनलाइन रॅम्प वाक स्पर्धेचे आयोजन पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते याला हवेलीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. या स्पर्धामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची आकर्षक सजावट करुन या स्पर्धेत भाग घेतला होता.

यावेळी भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी या स्पर्धेचे कौतुक केले त्याचा पारितोषिक वितरण सोहळा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समितीचे सभापती टिळेकर, माजी उपसभापती तथा सदस्य युगंधार काळभोर, माजी सदस्य हिरामण काकडे, उद्योजक बापू शितोळे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, प्रतिष्ठाणचे संस्थापक दत्ताञय काळे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, दत्ताञय कुंजीर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच बाबासाहेब काळभोर, संतोष कांचन, नागेश काळभोर , माजी उपसरपंच सुनिल कदम, बाळासाहेब कदम कोलवडीचे माजी उपसरपंच दिलीप उंद्रे, ज्ञानोबा कुंजीर, आनंद वैराट, दत्ता तांबे, मोरेश्वर काळे मान्यवर उपस्थित होते.

या रॅम्प वाक स्पर्धेत पहिले पारितोषिक हवेलीचा सर्जा राजा हा किताब व स्मृतिचिन्ह देऊन वडकी गावचे बैलगाडा मालक पै धनंजय शेवाळे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच दुसरे पारितोषिक कोलवडीचे गाडा मालक समीर उंद्रे व तिसरे पारितोषिक केसनंद येथील श्री माऊली हरगुडे यांना सन्मानित केले.

या स्पर्धेत काही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली त्यात कैलास गायकवाड (वडकी), इंद्रजित खुंटवड (फुरसुंगी), साईराज कोतवाल (आष्टापूर), वेदांत तांबे (उरुळी कांचन), नानासाहेब झांबरे (होळकरवाडी).

Previous articleमहिलांना व्यावसायीकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज- सविता कांचन
Next articleशिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी शिक्षकांच्या पाठीवर दौंड पंचायत समितीची कौतुकाची थाप