शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी शिक्षकांच्या पाठीवर दौंड पंचायत समितीची कौतुकाची थाप

योगेश राऊत ,पाटस

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत दौंड तालुक्यातील विविध शाळातील पाचवी मधील 13 व आठवी मधील 20 विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक शिक्षक यांचा सन्मान दौंड पंचायत समितीच्या  सभापती हेमलता फडके माजी सभापती आशा शितोळे उपसभापती विकास कदम माजी उपसभापती नितिन दोरगे सुशांत दरेकर प्रकाश नवले  गटविकास अधिकारी अजिंक्य येळे  यांच्या हस्ते व सर्व पंचायत समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी वनवे साहेब यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात प्रथमच पंचायत समिती स्तरावर गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली सर्व विद्यार्थी शिक्षक यांना प्रशस्तीपत्र व लेखणी देऊन सन्मानित करण्यात आले.यासाठी शैक्षणिक गुणवत्तेसाठी आग्रही असणाऱ्या सभापती हेमलता फडके यांच्या संकल्पनेतील या शैक्षणिक कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

     दौंड तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हाच पंचायत समितीचा सार्थ अभिमान आहे  असे गौरवोद्गार यावेळी सभापती हेमलता फडके यांनी काढले या कार्यक्रम प्रसंगी दौंड पंचायत समतीचे पदाधीकारी अधिकारी विद्यार्थी पालक उपस्थित होते

Previous articleहवेली तालुक्यात सगळ्यात पहिली आॕनलाईन बैलांची रॕम्पवाॕक स्पर्धेचे पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी केले आयोजन
Next articleकनेरसर शाळेत कामगार चळवळीचे नेते नारायण लोखंडे यांची पुण्यतिथी साजरी