महिलांना व्यावसायीकदृष्ट्या सक्षम बनवायचं असेल तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज- सविता कांचन

उरुळी कांचन

महिलांना व्यावसायीकदृष्ट्या सक्षम बनवणवायचं असेल तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गरज आहे तसेच विचारांची देवाणघेवाण होणे आवश्यक असल्याचे मत सविता रमेश कांचन यांनी व्यक्त केले.

उर्जा महिला स्वयंसहायता बचत गट आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उपस्थितीत महिलांशी बातचीत करताना कांचन बोलत होत्या.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन, प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय उरुळी कांचनच्या शुभांगी दिदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला हार घालून दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

तसेच जगाची मायमाऊली सिधुताई सपकाळ व गायीका गानकोकीळा लतादिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सामाजिक बांधिलकी जपत असताना ऊर्जा महिला बचत गटातर्फे महिलांना वाण म्हणून तुळस व गवतीचहाची वृक्ष देण्यात आले. महिलांना हळदीकुंकू विषयी शुभांगी दिदींनी आत्मा व परमात्मा बाबत माहिती दिली.

यावेळी नलीनी कांचन, मनिषा गरड,सुभद्रा पवार, बेबीताई कदम, नंदा कुंजीर, शैला मोरे, राजश्री कांचन, रेखा लोंढे, शैला कुंजीर, रेष्मा कांचन, शारदा ढमढेरे, सुनंदा घेमसड, छाया भोंग, दिपाली घेमरुड, शबाना पठाण आदी उपस्थित होत्या.

Previous articleपरमात्म स्वरुप होण्यासाठी कर्मयोगाने सात्विकता जपावी- डॉ रविंद्र भोळे
Next articleहवेली तालुक्यात सगळ्यात पहिली आॕनलाईन बैलांची रॕम्पवाॕक स्पर्धेचे पै. दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी केले आयोजन