राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हवेली तालुका सरचिटणीसपदी अजिंक्य तुपे यांची निवड

उरुळी कांचन

अजिंक्य हिरामण तुपे यांची हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शितोळे यांनी सदरची निवड केली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर , प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक चित्रपट कला विभाग विजय तुपे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब तुपे, युवा नेते सागर कांचन, साईनाथ वाळके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष स्वराज तुपे आदी उपस्थित होते.

पक्ष संघटनेचे विचार युवकांच्या पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करणार असे अजिंक्य तुपे यांनी सांगितले.

Previous articleनारायणगाव ग्रामपंचायतीचे वरिष्ठ लिपिक दिनेश वाव्हळ यांचे हृदयविकाराने निधन
Next articleपाटसला सुसज्ज आरोग्य केंद्र सुरु करणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन