पाटसला सुसज्ज आरोग्य केंद्र सुरु करणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन

योगेश राऊत, पाटस

दौंड तालुक्यातील पाटसला सुसज्ज आरोग्य केंद्र आणि खानवटे येथे आरोग्य उपकेंद्रास लवकरच मंजुरी दिली जाईल, दौंडला आरोग्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी गुरुवारी ( दि.३ ) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘व्हीआयपी सर्किट हाऊस पुणे ‘ येथे भेट घेतली.

यावेळी रमेश थोरात यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी तालुक्यातील आरोग्याच्या संदर्भातील विविध विषयावर चर्चा केली. तालुक्यातील पाटस येथे सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच खानवटे येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केलेले असून त्यास तात्काळ मंजूर करावेत, अशी मागणी रमेश थोरात यांनी त्यांच्याकडे केली.

तसेच तालुक्यातील मलठण, खडकी, राजेगाव आदी गावात आरोग्य उपकेंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दौंड तालुक्यातील आरोग्याच्या सुविधा लवकरच मार्गी लावू असे आश्वासन थोरात यांना दिले. अशी माहिती माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली. यावेळी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हवेली तालुका सरचिटणीसपदी अजिंक्य तुपे यांची निवड
Next articleदिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शिरूर तालुक्यातील हिवरे, तसेच मुखई व जातेगांवच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन