येरवडा येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून मृत कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या : भारतीय मजदूर संघाची मागणी

कुरकुंभ,सुरेश बागल

३ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे नगर रस्ता येरवडा येथे बेसमेंट चे काम चालू असताना, अचानक पणे लोखंडी वजनदार स्लँब ची जाळी कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला व अनेक कामगार जखमी झाले आहेत.

या मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई व बांधकाम कामगारांना न्याय देण्याचा हेतू ने भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा चे शिष्टमंडळाने कामगार उपायुक्त श्री अभय गीते यांच्या शी चर्चा करून कामगारांना , त्यांच्या वारसांना कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मागणींचे निवेदन देण्यात आले.

भारतीय मजदूर संघाच्या प्रमुख मागण्या –
१) अपघाताची सखोल चौकशी, करून दोषी कंपनी व ठेकेदाराचे परवाने रद्द करण्यात यावेत.

२) या चौकशी मध्ये संघटनेचे प्रतिनिधीना सहभागी करून घ्यावे.

३) अपघातात मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून रू ५० लाख व शासनाच्या किमान वेतनाच्या किमान ५०% रक्कम प्रति माहे पेंशन म्हणून देण्यात यावी, जखमी कामगारांना चांगले उपचार करण्यात यावेत. व २५ लाख रू आर्थिक मदत द्यावी.

४) चौकशी अहवाल त्वरित सादर करून अपघात टाळण्यासाठी प्रमाणीत पध्दत( STARAND OPERATING PROCEDURE) निश्चीत करण्यात यावी. व त्यांचे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी.

अशी मागणी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने करण्यात आली आहे . या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व बांधकाम कामगार संघांचे पदाधिकारी श्री उमेश विस्वाद उपस्थित होते.

या बाबतीत शासनाने, बांधकाम कंपनी ने कामगारांना न्याय न दिल्यास भारतीय मजदूर संघ त्रीव आंदोलन करण्याचा इशारा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण व उमेश विस्वाद यांनी दिलेला आहे.

Previous articleकोटमदरा येथील श्री दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात संपन्न
Next articleराष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वराज तुपे यांची निवड