कोटमदरा येथील श्री दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात संपन्न

आंबेगाव तालुक्यातील कोटमदरा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही,नयन मनोहर श्री दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात व भक्तीभावाने संपन्न झाला.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या कोटमदऱ्याचा हा परिसर खरच अभुतपुर्व नजरा आहे असे दर्शणासाठी आलेले भाविक सांगत आहे. साई जनसेवा संस्था व श्री स्वामी समर्थ परिवार संचलित श्री स्वामीदत्त आबालवृद्धाश्रम या ठिकाणी संस्थे अंतर्गत सलग पाच वर्षापासुन समाज सेवेची विविध प्रकारची कामे व उपक्रम करण्यात आली असल्याची माहिती श्री श्रीपाद वासुदेव अग्निहोत्री यांनी दिली.

यावेळी सकाळी सामुहिक संकल्प व गणेश पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाला.यावेळी सर्व भाविक -भक्तांच्या उपस्थितीत महाअरती घेण्यात आली.त्यानंतर गोहे बु ॥ ता. आंबेगाव येथील सुप्रसिद्ध किर्तनकार तसेच प्रवचनकार ह.भ.प प्रा.भास्कर महाराज जगदाळे यांनी आलेल्या भाविक -भक्तांना आपल्या प्रवचणाने मंत्रमुग्ध केले.तसेच परमपुज्य पद्माकर जोशी यांनी श्री दत्तात्रयाच्या मंत्राचे मार्गदर्शन केले.तसेच उपस्थीतांचा व देणगीदारांचा सत्कार यावेळी करण्यात आला.त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यासर्व कार्यक्रमाचे आयोजन साई जनसेवा संस्था,श्री स्वामी सर्मथ परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.

या ठिकाणी असलेल्या श्री स्वामीदत्त आबाल वृध्दाश्रमात चार अनाथ मुले आणि ४ वृद्ध महिला सध्या राहत असून संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांचे वडील,श्री नारायण गायकवाड यांनी दहा गुंठे जागा या श्री स्वामी दत्त आबाल वृध्दाश्रमासाठी व श्री दत्त मंदिरासाठी देणगी स्वरूपात दिली आहे.या आबाल वृद्धाश्रमातील बालक आणि वृद्धासाठी सेंद्रिय प्रकारची शेती करून अन्न पिकवले जाते.शेतीच्या पाण्यासाठी व श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रमासाठी विहिरीचीही व्यवस्था केली असल्याचे दिसून आले आहे.

तसेच या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या गोपालप्रिय गो शाळेचे देखिल उद्घाटन करण्यात आले. तसेच नव्याने भव्य अशा अन्नछत्राची उभारणी अवघ्या ६ दिवसातच करण्यात आली असून ८० X ३० चा संपुर्ण परिसर आहे ७०० ते ८०० नागरिक मावतील येवढा प्रशस्त हॉल उभा केला आहे. भविष्यात गोरगरीब लोकांच्या लग्नासाठी मोफत वापरण्यासाठी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश नारायण गायकवाड यांनी दिली.

Previous articleऊसाच्या ट्रॉली खाली सापडून सख्या बहिणींचा मृत्यू
Next articleयेरवडा येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून मृत कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या : भारतीय मजदूर संघाची मागणी