राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वराज तुपे यांची निवड

उरुळी कांचन

येथील स्वराज देविदास तुपे यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष करण कोकणे यांनी सदरची निवड केली. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते तुपे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विजय तुपे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ वाळके, युवा नेते सागर कांचन आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सर्वाना बरोबर घेऊन काम करणार असे तुपे यांनी सांगितले.

Previous articleयेरवडा येथील बांधकाम साईटवर झालेल्या अपघाताची सखोल चौकशी करून मृत कामगारांच्या वारसांना नुकसान भरपाई द्या : भारतीय मजदूर संघाची मागणी
Next articleचाकण- छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न