चाकण- छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न

चाकण : छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी गणेश जयंती निमित्त व मंडळाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोरोना प्रतिबंधक महालसीकरण शिबिर, मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर तसेच गणेश जन्मावर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता .यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

यावेळी सकाळी गणेश याग व होमहवणला सुमारे २५ जोड्या बसले होते. सकाळी ११ ते ५ लसीकरण शिबिरात सुमारे 210 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

जगदंब प्रतिष्ठान खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार दिलीप मोहिते यांनी Covishild चे डोस उपलब्ध करून दिले. आरोग्य शिबिरात 145 नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. मुक्ताई हॉस्पिटल डॉ. दादासाहेब गारगोटे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. सायं. ८ वा ह.भ.प. भागवत महाराज साळुंके यांचे गणेश जन्मावर प्रवचन झाले.

यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळ रौप्य महोत्सवी वर्षे साजरे करीत असताना सुमारे २५ सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व विविध क्षेत्रात समजपयोगी उपक्रम येत्या ८ महिन्यात राबविण्याचा संकल्प केला आहे.

Previous articleराष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी स्वराज तुपे यांची निवड
Next articleचाकण- छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर संपन्न