ऊसाच्या ट्रॉली खाली सापडून सख्या बहिणींचा मृत्यू

निरगुडसर- उसाने भरलेली टायर गाडी अंगावर पडून झालेल्या अपघातात दोन ऊस कामगार सख्ख्या बहिणीचा मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवार ( दि.४)रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मेंगडेवाडी गावच्या हद्दीत श्री गण्या डोंगर खिंडीत घडली आहे. या अपघातात जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे व भीमाबाई यादव गांडाळ या दोन महिला मयत झाल्या आहेत.याबाबत उल्हास पंढरीनाथ दुधवडे ( वय २५ पारगाव कारखाना ता. आंबेगाव जिल्हा पुणे, मूळ रा. घारगाव गाढव लोणी ता. संगमनेर जि. अहमदनगर ) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी हे भीमाशंकर साखर कारखाना पारगाव यांच्याकडे ऊस तोडणी कामगार म्हणून काम करत असून दि.४ रोजी ते निरगुडसर येथील शेतकरी महादू वळसे यांच्या शेतात ऊस तोडणीसाठी गेले होते. दिवसभर ऊस तोडून झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर नंबर एम.एच १६ सी.व्ही. 3514 या ट्रॅक्टर च्या मागे टायर गाडीमध्ये ऊस भरून घेऊन जात असताना टायर गाडीमध्ये ऊसावर फिर्यादीची आई जिजाबाई पंढरीनाथ दुधवडे ( रा.घारगाव ता.संगमनेर ) व मावशी भिमाबाई यादव गांडाळ ( रा.पळशी वनकुटे ता.पारनेर ) या दोघीजणी बसल्या होत्या. त्यावेळी ट्रॅक्टर शेतातून कारखान्याकडे जात असताना शेतातून बांधाच्या उतारावर ट्रॅक्टर पलटी होऊन टायर गाडी मधील सर्व ऊस व गाडी फिर्यादीच्या आई व मावशी यांच्या अंगावर पडून त्या गाडी खाली गेल्या स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून खाजगी रुग्णवाहिकेत द्वारे उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून त्या उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. याबाबत ट्रॅक्टर चालका विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेटे करत आहेत.

Previous articleशिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पस च्या वतीने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धा
Next articleकोटमदरा येथील श्री दत्त मंदिराचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठया उत्साहात संपन्न