शिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पस च्या वतीने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धा

चाकण- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी केली जाते. यावेळी शिवप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या अनुषंगाने पी के टेक्निकल कॅम्पस च्या वतीने यावर्षी ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पी के फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या वाचनात शिवरायांचा इतिहास यावा यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शिवचरित्र वाचावे,देशप्रेम जागृत व्हावे, मन,मनगट आणि मेंदू केवळ आणि केवळ मातृभूमीच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी वापरले जावे.यादृष्टीकोनातून पोवाडा गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर स्पर्धा ही सर्व वयोगटासाठी खुली आहे.

या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी तसेच इतरांनी आपला पोवाडा दिनांक १४/२/२०२२ पर्यंत 9146034239 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा.या स्पर्धेचा निकाल १६ फेब्रुवारी २०२२ रोजी लागणार असून संबंधित स्पर्धेचा बक्षीस वितरणसोहळा १९ फेब्रुवारी२०२२ रोजी सकाळी नऊ वाजता पी.के टेक्निकल कॅम्पस कडाचीवाडी,चाकण येथे होणार आहे. सदर पोवाडा गायनस्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रु.सात हजार, द्वितीय क्रमांक रु.पाच हजार तर तृतीय क्रमांकासाठी रुपये तीन हजार अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आलेली असून विजेत्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देखील देण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील अधिकाधिक कलावंतांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे अवाहन पी के फाऊंडेशन च्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleभारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा ; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर
Next articleऊसाच्या ट्रॉली खाली सापडून सख्या बहिणींचा मृत्यू