भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा ; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर

नारायणगाव : किरण वाजगे

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र व कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Previous articleराष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराचे निमदरी मध्ये उत्साहात उद्घाटन
Next articleशिवजयंती निमित्त पी के फाउंडेशन संचलित पी के टेक्निकल कॅम्पस च्या वतीने ऑनलाइन पोवाडा गायन स्पर्धा