सासवड येथील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या,पुणे एलसीबीची कामगिरी

अमोल भोसले,उरुळी कांचन

सासवड येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे . याबाबतीत पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना या पथकास माहिती मिळाली की सासवड पोलिस स्टेशन मध्ये भा.द. वि. कलम 394,34 अन्वये दाखल एका गुन्ह्यातील दोन आरोपी सध्या फरार आहेत ते पुरंदर तालुक्यातील वाघापूर चौकात येणार असल्याच्या माहितीवरून सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपी विलास विनोद सोळंकी (वय १८ वर्षे रा. खंडोबानगर सासवड ता . पुरंदर जिल्हा पुणे ) याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता सदरचा गुन्हा त्याचे इतर अटक आरोपीसोबत केला असल्याचे कबुली दिली आहे . यावरून त्यास आणि त्याच्यासोबत असलेल्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधीचा संघर्षित मुलास ताब्यात घेतले असून सदर आरोपी पुढील तपास कामी सासवड पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरचे कारवाईही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते ,भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके ,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार बाळासाहेब कारंडे , पोलीस हवालदार अजय घुले, पोलीस हवालदार विजय कांचन, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी केली आहे.

Previous articleश्री क्षेत्र ओझर येथे लेझर फाऊंटन शो कार्यक्रमाचे आयोजन
Next articleराष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराचे निमदरी मध्ये उत्साहात उद्घाटन