श्री क्षेत्र ओझर येथे लेझर फाऊंटन शो कार्यक्रमाचे आयोजन

नारायणगाव , किरण वाजगे

ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त प्रथमच श्री क्षेत्र ओझर येथील कुकडी नदीपात्रात लेझर फाउंटन शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या लेझर शो चे उद्घाटन पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने केले.


देवदर्शनाबरोबरच भाविकांच्या मनोरंजनासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रम उपलव्ध झाल्यास या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होवून पर्यटनाला अधिक चालना मिळण्याचा प्रयत्न श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट ने केला असल्याचे राज्य मंत्री तटकरे यांनी सांगितले . त्या बोलताना म्हणाल्या श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट साठी भविष्यामध्ये कोणताही निधी कमी पडनार नाही. स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत चर्चा करून श्री क्षेत्र ओझर येथे पर्यटन वाढीसाठी सकारात्मक रित्या पर्यटनाचे शाश्वत मॉडेल लवकरच विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच त्या ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश कवडे यांच्याशी बोलताना म्हणाल्या की, अशा पद्धतीचा प्रकल्प ओझर या ठिकाणी होण्यासाठी राज्य शासना कडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

ओझर या ठिकाणी प्रथमच लेझर शो आयोजन करण्यामागचा हेतू देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्षांनी बोलताना सागितला की, श्री क्षेत्र ओझर मध्ये आलेला भाविक दर्शनाबरोबर या ठिकाणी थांबून त्याला मनोरंजना बरोबर श्री विघ्नहराची पौराणिक कथा , तसेच माहाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देखील उज्वोलीत होणार आहे . म्हणून श्री क्षेत्र ओझर येथे अशा पद्धतीचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने उभा राहिल्यास श्री क्षेत्र ओझर च्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

या फाउंटन शो कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपाध्यक्ष अजित कवडे ,सचिव दशरथ मांडे , खजिनदार कैलास घेगडे, विश्वस्त रंगनाथ रवळे ,आनंदराव मांडे, किशोर कवडे, मंगेश मांडे, मिलिंद कवडे, कैलास मांडे, विजय घेगडे , श्रीराम पंडित,सौ राजश्री कवडे , ओझर नं २ गावच्या सरपंच तारामती कर्डक ,ग्रामपंचायत सदस्य अक्षदा मांडे , मीरा जगदाळे व मोठ्या संख्येने भाविक व गणेशभक्त तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान ट्रस्ट चे खजिनदार कैलास घेगडे व मंगेश मांडे यांनी केले.

Previous articleयशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सोपानराव तात्याबा उंद्रे पाटील यांचे निधन
Next articleसासवड येथील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या,पुणे एलसीबीची कामगिरी