राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराचे निमदरी मध्ये उत्साहात उद्घाटन

नारायणगाव : किरण वाजगे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव,ग्रामपंचायत निमदरी, कुलस्वामिनी रेणुका माता देवस्थान ट्रस्ट निमदरी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व माझी वसुंधरा माझं गाव, कोरोना मुक्त गाव यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. शनिवार दि.५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये निमदरी गावामध्ये हे शिबीर होणार आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे यांनी केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख व सन्मान पुणे जिल्हा समन्वय डॉ. श्रीकांत फुलसुंदर यांनी करून दिली.

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रेरणादायी वक्ते व रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष सारंग माताडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास कसा करावा, प्रत्येक संकटाकडे संधी म्हणून पहावी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे महत्त्वाचे असते. कारण गुरु मार्ग दाखवत नाही तर मार्गावर चालण्याची शक्ती देतात गुरूंकडून सेवेच्या संधीचा चांगला दृष्टीकोन मिळतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये नियोजनात्मक स्किल डेव्हलप करणे गरजेचे आहे. स्वतःचा शोध घेणे गरजेचे आहे प्रत्येक व्यक्ती ही कायमच विद्यार्थी असते. नेहमी दुसऱ्याकडून चांगले गुण चांगले कर्तुत्व घ्या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी सकारात्मक विचार देऊन शुभेच्छा दिल्या. असे प्रेरणादायी विचार प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे सचिव दिलीप भगत सर यांनी मनोगत व्यक्त करताना पूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा सर्वांना दिला. व राष्ट्रीय सेवा योजना शिबिर या गावामध्ये आणल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले. डी .वाय .पाटील महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख अलकनंदा माताडे मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांना युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांची कार्यक्षमतेची जाणीव करून दिली.

या कार्यक्रमाप्रसंगी निमदरी गावचे उपसरपंच संतोष घुले, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा घुले, निमदारी गावचे सर्व ग्रामस्थ,कार्यक्रम अधिकारी विशाल औटी ,श्‍वेता वाघमारे, मयूर मोरे, प्रसाद फुलसुंदर, ओंकार मेहेर, सौरभ शिंदे, विजय कोल्हे, हरी कुकरेजा राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थी प्रतिनिधी पुर्वा कर्पे साक्षी, बढेकर, साहिल इनामदार, शिबिरात सहभागी झालेले सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वैशाली मोढवे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. स्वप्निल कांबळे यांनी मानले.

Previous articleसासवड येथील जबरी गुन्ह्यातील फरार आरोपीच्या मुसक्या आवळल्या,पुणे एलसीबीची कामगिरी
Next articleभारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा ; राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर