राजमाची हून नरवीर तानाजी मालुसरेंना अभिवादन

राजगुरूनगर- किल्ले राजमाचीच्या श्रीवर्धन बालेकिल्ला आणि मनरंजन वर शिवदुर्गं साम्राज्य प्रतिष्ठान आणि टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार आणि महाराजांचे बालपणीचे सवंगडी नरवीर तानाजी मालुसरे यांना भगवा स्वराज्य धव्ज हाती घेत अभिवादन करण्यात आले.

या मोहिमेची सुरवात राजमाची गाव (ता. मावळ जि.पुणे) येथून झाली. किल्ले राजमाचीच्या श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन्ही ठिकाणी गिर्यारोहकांनी भगवा स्वराज्य धव्ज हाती घेत नरवीर तानाजी मालुसरे यांना अभिवादन केले.

या मोहिमेत “दुर्गराज राजगड” चे लेखक राहुल नलावडे, नितीन चव्हाण, तानाजी राजगुडे, कचरू चांभारे, बाबाजी शेटे, रविंद्र गाढवे, प्रेमकुमार तळेकर, सोपान तुपे, डॉ. अजय इंगळे, गणेश गोसावी, सोमनाथ सोनावणे, ओंकार रौंधळ, डॉ. समीर भिसे हे सहभागी झाले होते.

Previous articleतडीपार सराईत गुन्हेगार राज पवारला अटक: लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी
Next articleगणेश जयंती निमित्त ओझरच्या विघ्नहराचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन