स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय जगताप, विजय कांचन, धिरज जाधव यांचा बहिर्जी नाईक पुरस्काराने गौरव

उरुळी कांचन

स्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय जगताप, विजय कांचन, धिरज जाधव याना बहिर्जी नाईक पुरस्कार पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामिण जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी तसेच गोपनीय माहिती काढून जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस आणणारे पोलीस अंमलदार यांचा कार्य गौरव सन्मान केला.

पुणे ग्रामीण पोलिस दलात सर्वोउत्कृष्ट समजला जाणारा ” बहिर्जी नाईक पुरस्कार हा पोलिस अधिक्षक यांचे हस्ते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार दत्तात्रय गोरक्षनाथ जगताप , विजय तुकाराम कांचन , धिरज भानुदास जाधव यांना रोख रक्कम १०,००० रु आणि बहिर्जी नाईक पुरस्कार चे प्रमाणपत्र देण्यात आले असून यापुढे देखील असेच चांगली कामगिरी करण्यासाठी वरील पोलिस अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या .

Previous articleप्रा.नितीन बटुळे सेट परीक्षा उत्तीर्ण: मराठी विभागाच्या वैभवात मानाचा तुरा
Next articleमराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला-अजित पवार