प्रा.नितीन बटुळे सेट परीक्षा उत्तीर्ण: मराठी विभागाच्या वैभवात मानाचा तुरा

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर मराठी विभागाचे माजी विद्यार्थी प्रा.नीतिन रणजीत बटूळे हे सप्टेंबर २०२१ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेतलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी परीक्षेत ते मराठी विषयात नुकतेच उत्तीर्ण झाले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे, उपाध्यक्ष श्री. तुकाराम काळे, कार्याध्यक्ष श्री.शिवाजीराव घोडेकर,सचिव अॕड.मुकुंदराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड.संजय आर्विकर,न्यू इंग्लिश मेडियमचे चेअरमन श्री.अजितशेठ काळे, प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव, उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ.पुरुषोत्तम काळे, प्रा.पोपटराव माने, निमगाव सावा येथील दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,सेवक,इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा.बटूळे हे मराठी विभागातील सेट उत्तीर्ण झालेले १७ वे माजी विद्यार्थी आहेत.विभागातील १७ विद्यार्थी आजमितीस एकुण २३ वेळेस सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत.प्रा.नितिन बटुळे हे नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटीचे,
नवसह्याद्री गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज, नायगाव,नसरापूर
ता.भोर जि. पुणे येथे ते कार्यरत आहे.

Previous articleउरुळी कांचन ग्रामपंचायतीला जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ७९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी मंजूर
Next articleस्थानिक गुन्हे शाखेचे दत्तात्रय जगताप, विजय कांचन, धिरज जाधव यांचा बहिर्जी नाईक पुरस्काराने गौरव