राजेगावमध्ये प्रहारच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर संपन्न

दिनेश पवार,दौंड

राजेगांव (ता.दौंड ) येथे प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरात ९७ रुग्णांची तपासणी करण्यात आली .यामध्ये२१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र करण्यात आले.

मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे शस्रक्रिया केली जाणार आहे. २३ रुग्णांना अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले.

यावेळी अहमदनगरचे जल मित्र मिलिंद बागल , दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष रफिक सय्यद ,बुधराणीचे डॉ . वैभव गाढवे , पत्रकार विठ्ठल मोघे ,भाऊ बाबर ,गणेश वाघमारे ,अभिजीत पानसरे , आंनद मेंगावडे उपस्थित होते.

Previous articleआजचा अर्थसंकल्प देशाला अधोगतीकडे नेणारा- रविकांत वरपे
Next articleजवळार्जून गावा मध्ये उसाला आग लागल्याची समजताच माजी आमदार अशोक टेकवडे धावले शेतकऱ्यांच्या मदतीला