पाटस शिंदे वस्ती अंगणवाडी नवीन इमारतीचे उद्घाटन

योगेश राऊत , पाटस

26 जानेवारी 2022 रोजी  पाटस (अंबिका नगर)  येथे एकात्मिक बाल  विकास  प्रकल्प योजन दौंड १ अंगणवाडी शाळेचे नूतन इमारतीचे उदघाटन  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. इमारतीसाठी सारिका  पानसरे समाज कल्याण विभाग सभापती यांच्या विशेष प्रयत्नातून ८ लाख ५०हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती .

या  नूतन  इमारतेचे  उदघाटन ग्रामपंचायत कसबे पाटस चे सरपंच अवंतिका शीतोळे यांच्या हस्ते करण्यात आले तर विठ्ठल आबा शिंदे यांनी पूजा करून नारळ फोडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटस गावचे सरपंच अवंतिका शितोळे , तर प्रमुख पाहुणे  म्हणून वसंतराव साळुंखे साहेब  शिवसंग्राम पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष व युवा सहकारी संजय शिंदे शिवसंग्राम पक्ष दौंड तालुका अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप पोळेकर आदी उपस्थित होते.

या  कार्यक्रमानिमित्त  ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र विठ्ठल शिंदे यांनी शाळेसाठी  लागणारे साहित्य- कपाट, टेबल-खुर्ची व मुलांसाठी  खेळण्याचे साहित्य स्वखर्चातून दिले आहे .शाळे- समोर परसबाग तयार करण्यासाठी जे फळाचे झाडे लागणार आहेत ती झाडे  देण्यात येणार आहेत. शाळेला लागणाऱ्या बोलक्या भिंतीची देखिल तरतूद करून देतो असे ते यावेळी म्हणाले.

या  कार्यक्रमानिमित्त सरपंच अवंतिका शितोळ, उपसरपंच मस्के ,ग्रामपंचायत सदस्य रंजनाताई पोळेकर आशा वर्कर सुनीता पवार, सुमन जाधव अंगणवाडी सेविका, सामजिक कार्यकरते रोहित शितोळे , सुजाता जठार आणि सर्व अंगणवाडी शिक्षिका  आणि  पाटस गावातील सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्र संचालन गिरे सर यांनी केले तसेच विठ्ठल शिंदे यांनी मुलाना खाऊ  वाटप केले. आणि भुजंग जाधव  यांनी आभार मानले .

Previous articleनिसर्ग राजा मित्र जीवांचे’ संस्थेचा १३ वर्धापनदिन उत्साहात साजरा
Next articleनिधन‌‌ वार्ता – ठकुबाई लेंडे यांचे वृध्दापकाळाने निधन