निसर्ग राजा मित्र जीवांचे’ संस्थेचा १३ वर्धापनदिन उत्साहात साजरा

गणेश सातव ,वाघोली पुणे

पिंपरी चिंचवड परिसरातील निसर्गराजा मित्र जीवांचे या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. दरवर्षी वर्धापनदिना निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस संस्थेच्या वतीने मित्र जीवांचे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील शिवशंकर दगडू चापुले यांना प्रदान करण्यात आला. ५००० रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुर्मिळ वनस्पतींच्या बीयांचे संकलन करुन बीज बँकेची निर्मिती या उपक्रमासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चाप्टरचे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर होते

दिघी येथील संस्थेच्या रोपवाटिकेत पार पडलेल्या सोहळ्यात अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण संशोधक डॉ. सचिन पुणेकर, केंद्रीय भूजल विभागातील संशोधक आणि सहज जलबोधकार उपेंद्रदादा धोंडे,विजय वाळके, डॉ. अभय कुलकर्णी, उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, माझ्या एकट्याच्या कामाने काय फरक पडतो हा विचार सोडून देवून काम सुरू ठेवले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. बेडेकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात केले.पिंपरी चिंचवड तसेच महाराष्ट्रातील पर्यावरण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक या सोहळ्यास उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि आपला राज्य वृक्ष आंबा या वृक्षाचे पूजन करून करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष किरण घोटकुले यांनी गेल्या वर्षभरात संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, त्यातील अंकुर आणि वृक्ष परिचय या उपक्रमाना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला होता.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मारुती साळुंखे यांनी केले होते तर आभार राहुल घोलप यांनी मानले.

Previous articleअन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी लेखणीच्या तलवारीचा वापर करते- ज्येष्ठ आदिवासी कवयित्री मा.उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन
Next articleपाटस शिंदे वस्ती अंगणवाडी नवीन इमारतीचे उद्घाटन