मतदान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

घोडेगाव – येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग,राष्ट्रीय छात्र सेना,राष्ट्रीय सेवा योजना या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मतदान दिन साजरा करण्यात आला.

या निमित्ताने महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने या विभागातील सहाय्यक प्रा. सुनील नेवकर यांनी शपथ घेऊन त्यांनी मतदानाचे महत्त्व विशद केले. प्रा.सचिन घायतडके यांनी आॕनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली होती. या प्रश्नमंजुषेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कार्यक्रम अधिकारी डॉ.वल्लभ करंदीकर यांनी निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण,पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

निबंध स्पर्धेसाठी १) प्रबळ लोकशाहीचे एक लक्षण मताधिकार. २) मी मतदान करणार कारण….. ३) वंचितांचे हक्क मिळवण्याचा मार्ग म्हणजेच मतदान ४) मतदानाची अनास्था कारणे आणि उपाय इ. विषयावरील निबंधलेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.बी. जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.सुनील नेवकर, प्रा.सचिन घायतडके, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रोफेसर डॉ. बाळासाहेब गव्हाळे,कार्यक्रम अधिकारी डॉ.वल्लभ करंदीकर यांनी केले.

Previous articleउरुळी कांचन येथे बायफ किसान मार्ट व गायींच्या दुधाच्या एटीएमचे उद्घाटन
Next articleअन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी मी लेखणीच्या तलवारीचा वापर करते- ज्येष्ठ आदिवासी कवयित्री मा.उषाकिरण आत्राम यांचे प्रतिपादन