उरुळी कांचन येथे बायफ किसान मार्ट व गायींच्या दुधाच्या एटीएमचे उद्घाटन

अमोल भोसले,उरुळी कांचन

बायफच्या ग्रामीण विकासाच्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आणि डॉ. मणिभाई देसाई यांच्या दूरदृष्टीता व उरुळी कांचन बद्दलची आत्मीयता हा उद्देश समोर ठेऊन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून “बायफ किसान मार्ट” आणि “बायफच्या गायींच्या दुधाचे एटीएम या दोन संकल्पनांचा उद्घाटन कार्यक्रम कम्युनिटी हेल्थ रिसर्च सेंटर उरुळी कांचन येथे यशस्विरित्या पार पडला.

बायफ किसान मार्ट या उपक्रमाअंतर्गत बायफची उच्च गुणवत्तेची विविध उत्पादने जसे खनिज मिश्रणे, चारा पिकाची बी-बियाणे, जैविक खते, गांडूळखत, बायोप्रोम , सौर ऊर्जेवर वाळवलेली खाद्यपदार्थ व रेशीम उत्पादने (सिल्क साड्या, कुर्ते, कापड, शर्ट इत्यादी.) सर्व शेतकरी, दुध उत्पादक व सर्व ग्राहक यांच्यासाठी माफक दरात एकाच छत्राखाली उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. त्याच बरोबर बायफच्या गायींच्या दुधाचे एटीएम या संकल्पनेअंतर्गत बायफच्या गोशाळेतील उच्च गुणवत्तेच्या गायींच्या उच्च दर्जाच्या दुधाचा पुरवठा करणे हा मुख्य हेतू तसेच विविध बचत गट व शेतकरी संस्था यांच्या मार्फत एक तंत्रज्ञान म्हणून विकसित करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन एक उत्कृष्ट संकल्पना म्हणून उरुळी कांचन येथे बसवले आहे. या एटीएम द्वारे विकसित तंत्रज्ञानाचा वापर करून कार्ड वापरून पैशाच्या एटीएम प्रमाणे दुधाच्या एटीएमचा वापर होणार आहे.

या दोन्ही संकल्पनाचे उद्घाटन मााजी सरपंच माऊली कांचन, जेष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन यांच्या शुभहस्ते व बायफ अध्यक्ष भरत काकडे, बायफ वरिष्ठ उपााध्यक्ष डॉ. अशोक पांडे, महात्मा गांधी सर्वोदय संंघाचे उपाध्यक्ष सोपान कांचन, खजिनदार राजाराम कांचन, विश्वस्त महादेव कांचन, संभाजी कांंचन, मनोहर कांचन, प.स.सदस्या हेमलता बडेकर, वैशाली महाडिक, सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता बागडे, पु.जि.नि.सदस्य संतोष कांचन, चेेअमन मणिभाई पतसंस्था राजेंद्र कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांंचन, भाऊसाहेब कांंचन, सदस्या संचिता कांंचन, राजेंद्र कांचन, मयूर कांचन, शंकर बडेकर, सुनिल तांबे, मा.सरपंच दत्तात्रय कांचन, भाऊसाहेब तुपे, अलंकार कांचन यांच्या उपस्थितीत पार पडले.

सदर कार्यक्रमासाठी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त मंडळ, निसर्गोपचार आश्रमातील पदाधिकारी, संकल्प बचत गटाचे पदाधिकारी, बायफचे वरिष्ठ पदाधिकारी व सर्व संबधित स्टाफ, पत्रकार, राजकीय व शैक्षणिक स्तरातील मान्यवर, युवा उद्योजक इत्यादींची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे नियोजन सहकारी मानसिंग कड आणि हनुमंत भोसले व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने डॉ. मनोजकुमार जनार्धन आवारे यांनी केले तसेच या दोन्ही उपक्रमांबद्दल तांत्रिक माहिती सर्व उपस्थिताना सांगितली. या कार्यक्रमासाठी डॉ. जयंत खडसे मनोहर कांचन यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleपूर्व हवेलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
Next articleमतदान दिन विविध कार्यक्रमांनी साजरा