पूर्व हवेलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अमोल भोसले,उरुळी कांचन

देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन पूर्व हवेलीतील उरुळी कांचनसह परिसरात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण उपसरपंच अनिता बगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामपंचायत हद्दीतील विद्यालये, जिल्हा परिषद शाळा, सरकारी कार्यालये, आदी ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, सरपंच संतोष कांचन, माजी उपसरपंच संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्या सुजाता खलसे, सीमा कांचन, प्रियंका पाटेकर, अनिता तुपे, अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, शंकर बडेकर, सुनिल तांबे, मयूर कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरेगावमुळ ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच लिलावती बोधे, सदस्य दत्तात्रय काकडे, सचिन निकाळजे, पोलीस पाटील वर्षा कड, आदी ग्रामस्थ, सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाणे अंकित उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र येथे ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलीस अंमलदार दिवेकर, महिला पोलीस कर्मचारी होले, रमेश गायकवाड, बाळासाहेब घाडगे आदी उपस्थित होते.

तसेच उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ध्वाजारोहण जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे, आरोग्य सहाय्यक महेंद्र उकिरडे, संतोष वाघमारे, अतुल गाढवे, राजेंद्र शेलार, अनिता छत्रीकर, दीपा लोखंडे, सतीश गायकवाड, गणेश कामठे आदी उपस्थित होते.

भवरापुर ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण फौजी राजु सातव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच सचिन सातव, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

टिळेकरवाडी ग्रामपंचायतचा ध्वजारोहण पोलीस पाटील विजय टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिदास टिळेकर, संतोष टिळेकर, सुभाष टिळेकर, सदाशिव टिळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण सरपंच गणेश चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी सरपंच राजेंद्र चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

श्रीप्रयागधाम ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण श्रीप्रयागधाम हॉस्पिटलचे संचालक महात्माजी आतमप्रेमानंदजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच ब्रिजमोहन धवन, जयश्री चांदणे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दाभाडे, बाबु हाके, डॉ देविदास चांदणे, सदस्य उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात डॉ वर्षा गुंजाळ यांना राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणानंतर पहिल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा मान
Next articleउरुळी कांचन येथे बायफ किसान मार्ट व गायींच्या दुधाच्या एटीएमचे उद्घाटन