एमटीडीसी व‌ पराशर कृषी व संस्कृती पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने होम स्टे व महाभ्रमण योजने अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे-

प्रसिद्ध पर्यटन स्थळी पर्यटकांची गर्दी होत असते, आलेल्या पर्यटकांच्या निवासी व्यवस्थेसाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट सज्ज असतात.सध्याचा पर्यटनाचा ट्रेंड हा अनुभव सिद्ध पर्यटनाचा आहे, देश-विदेशातून येणार्‍या पर्यटकांना, पर्यटन स्थळाला भेट देण्यासोबतच; स्थानिक खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती यांचाही अनुभव हवाहवासा वाटतो. त्यासाठी होम स्टे ही चांगली संकल्पना आहे, आपल्या राहत्या घरातील; वापरात नसलेल्या खोल्यांचा उपयोग होमस्टे संकल्पनेच्या माध्यमातून पर्यटकांना उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. तसेच आपल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव सुद्धा पर्यटकांना मिळू शकतो. बदल्यात आपल्याकडे वापरात नसलेल्या संसाधनांचा उपयोग, रोजगार निर्मितीसाठी पण करता येतो. केरळ, उत्तराखंड, उत्तरांचल, कर्नाटक, राजस्थान अशा काही राज्यांमध्ये होमस्टे ही संकल्पना नावारूपाला आलेली आहे.

महाराष्ट्रातही कोकणात होमस्टे ही संकल्पना चांगल्या प्रकारे मूळ धरत आहे. एमटीडीसीच्या निवास व न्याहरी योजनेअंतर्गत होमस्टे नोंदणीकृत करता येतात तसेच होम स्टे च्या पुढच्या टप्प्यात महाभ्रमण योजनेअंतर्गत पर्यटकांना सांस्कृतिक अनुभव देता येतो. घाटमाथ्यावर पुणे परिसरात होमस्टे, ही संकल्पना नावारूपाला यावी म्हणुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पुणे आणि पराशर कृषी व संस्कृती पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने होमस्टे, निवास व न्याहरी आणि महाभ्रमण योजना एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पराशर कृषी व संस्कृती पर्यटन राजुरी जुन्नर येथे आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत होमस्टे संकल्पना होमस्टे संकल्पनेतील भविष्यातील संधी निवास व न्याहारी योजना महाभ्रमण योजना तसेच पर्यटन पूर्वक उद्योग व्यवसाय यांचे प्रशिक्षण तज्ञांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या एकदिवसीय कार्यशाळेतील सहभागासाठीचे शुल्क हे प्रत्येकी 1500रुपये असून, सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त 25 लोकांचा सहभाग असणारी ही कार्यशाळा असणार आहे.

अधिकच्या माहितीसाठी पराशर कृषी व संस्कृती पर्यटन केंद्राचे संचालक तसेच पर्यटन प्रशिक्षक व सल्लागार श्री मनोज हाडवळे यांच्याशी 9970515438/7038890500 या क्रमांकावर संपर्क साधावा. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या परिसरात भविष्यातील पर्यटनाच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या निवासासाठी तसेच अनुभवसिद्ध पर्यटन विकसित होण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC), पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी दिली.

Previous articleसामाजिक बांधिलकीतून प्रजासत्ताक दिन साजरा
Next articleनारायणगावात डॉ वर्षा गुंजाळ यांना राजा शिवछत्रपती प्रवेशद्वाराच्या नूतनीकरणानंतर पहिल्या ऐतिहासिक ध्वजारोहणाचा मान