सामाजिक बांधिलकीतून प्रजासत्ताक दिन साजरा

पाटस, योगेश राऊत

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दौंड तालुक्यातील पाटस येथील पाटस ग्रामविकास फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नागेश्वर विद्यालय पाटस या शाळेतील इयत्ता नववी व दहावीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना ड्रेस चे वाटप करण्यासाठी शाळेचे शिक्षक श्री उत्तम रुपणवर सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

या आधीही चौफुला,बोरमल नाथ परिसरातील वीटभट्टी कामगारांच्या मुलामुलींना सुमारे 200 ड्रेस चे वाटप करण्यात आले होते. पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना 365 दिवस वह्यांची मदत केली जाते.

ड्रेस वाटप प्रसंगी पाटस ग्रामविकास फाउंडेशन च्या संचालिका अपर्णा कुरूमकर,आफ्रिन तांबोळी,अध्यक्ष विनोद कुरूमकर,उपाध्यक्ष गणेश जाधव,सचिव हर्षद बंदिष्टी, खजिनदार ,जुनेद तांबोळी ,कार्याध्यक्ष गणेश शितोळे ,सहकार्याध्यक्ष राजु गोसावी उपस्थित होते.

Previous article“बाण” वर फडकाविला तिरंगा : टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सची साहसी मोहीम फत्ते
Next articleएमटीडीसी व‌ पराशर कृषी व संस्कृती पर्यटन यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने होम स्टे व महाभ्रमण योजने अंतर्गत एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन