पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी मोठ्या बंधूंच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचन ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका दिली भेट

अमोल भोसले,उरुळी कांचन

आजही समाजात दानशूर मंडळी आहेत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताचा अनाठायी खर्च टाळून समाज उपयोगी जे आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करतात पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी आपल्या मोठ्या बंधूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उरुळी कांचन मधील नागरिकांच्या सेवेसाठी मोफत रुग्ण वाहिका देण्यात आली खरोखरच हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी आपले ज्येष्ठ बंधू संजय आबासाहेब कांचन यांच्या वाढदिवसा निमित्ताने उरुळी कांचन ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका भेट दिली. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अशोक पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

सामाजिक भावनेतुन लोकसेवेचा वारसा आपल्या वडिलांच्या व आईच्या संस्कारातून संतोष आबासाहेब कांचन व त्यांचे बंधू चालवत आहे आजपर्यंत अनेक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले असल्याचे मत शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

यावेळी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विकास दांगट, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य महादेव कांचन, माजी उपसरपंच संचिता संतोष कांचन, उरुळी कांचन ग्रामपंचायतचे सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता बगाडे,ग्रामपंचायत सदस्या सिमा कांचन,सुजाता खलसे,डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, भाऊसाहेब तुपे, राजेंद्र कांचन, मयूर कांचन, शंकर बडेकर, स्वप्निशा कांचन, प्रियंका कांचन, युवा नेते सुदर्शन कांचन, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिल दत्तात्रय कांचन व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमहिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- प्रा.सुरेश वाळेकर
Next articleखामगावात लग्न समारंभातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या “पवार अॕग्रो रिसॉर्ट” वर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी