महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- प्रा.सुरेश वाळेकर

उरुळी कांचन

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातुन विविध शासकीय योजनांचा व स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिला सबलीकरणाचे सक्षमीकरण करावे असे मनोगत सद्गुरु सेवा विकास प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा स्तरावरील बाल कामगार समिती सदस्य प्रा.सुरेश वाळेकर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमास चिंतामणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुवर्णा वाळेकर, सचिव स्वाती कुंभार, धनश्री महिला बचत गटाच्या सचिव मिना घोडेराव, उपस्थित होत्या. संस्थेअंतर्गत सौभाग्यवती महिला बचत गट आळंदी म्हातोबा (पानमळा) या गटाची सात आठ वर्षापासुनची वाटचाल कौतुकास्पद आहे. या बचत गटाचे कार्य आणि कामकाज उल्लेखनीय आहे. या बचत गटाच्या अध्यक्षा अश्वीनी शिवरकर, सचिव तृप्ती शिवरकर, यांनी बचत गटातील सदस्य व ग्रामस्थ महिलांना एकञ बोलुन हळदी कुंकु कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांना सुंदर गिफ्टचे वाटप केले व अल्पोपहार दिला.

सदर कार्यक्रमाचे सुञसंचालन तृप्ती शिवरकर यांनी केले तर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिला व युवतींचे आभार अश्विनी शिवरकर यांनी मानले.

Previous articleतमाशा फडमालक व तमासगीरांच्या भावना तीव्र
Next articleपुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी मोठ्या बंधूंच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचन ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका दिली भेट