खामगावात लग्न समारंभातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या “पवार अॕग्रो रिसॉर्ट” वर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे यांची मागणी

कुरकुंभ,सुरेश बागल

खामगाव बु !! (ता. दौंड ) यांच्या पश्चिमेस गावच्या हद्दीत असणाऱ्या “पवार अॕग्रो रिसॉर्ट” मध्ये लग्न समारंभ व इतर समारंभ झालेवर टाकाऊ अन्न व फळे तसेच इतर नाशवंत वस्तू गावच्या पश्चिमेस असणाऱ्या दहीटणे-खामगाव”वनविभागामध्ये ” रस्त्याजवळच टाकली जातात त्यामुळे खुप दुर्गंधी येत असते.

रस्त्याने ये – जा करणाऱ्या वाहनचालकांना येथिल दुर्गंधीयुक्त दुषित वातावरणाचा वांरवार सामना करावा लागत आहे सध्या कोरोना रोगाचं प्रादुर्भावामुळे टाकलेल्या वेस्ट मटेरियल मुळे परिसरातील गावांमध्ये रोगराई पसरून लोक, लहान मुले आजारी पडण्याची शक्यता आहे तरीही या रिसोर्ट वाल्यांनी टाकलेला कचरा, अन्न रस्त्याकडून लवकरात लवकर हटवून त्यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रिसोर्टवाल्यांना एकदा समज द्यावी तसेच परत जर कचरा टाकल्यास ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यात यावी तसेच अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यास रिसोर्ट समोर मी सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे आंदोलन करणार आहे.

Previous articleपुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी मोठ्या बंधूंच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचन ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका दिली भेट
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टद्वारे राज्यातील तमाशा कलावंतांसाठी एक कोटी रुपये आर्थिक मदत